मुंबई/सिंधुदुर्ग: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात सिंधुदुर्गात मोठा राजकीय ‘टर्निंग पॉइंट’ घडला असून, जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून, ठाकरे गटाने जिल्ह्यात आपली ताकद अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन वैभव नाईक यांचे अभिनंदन करत आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले. “एकजुटीने आणि आक्रमकपणे कामाला लागा,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
निवडीनंतर वैभव नाईक यांनी, “पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मान आणि आव्हान दोन्ही आहे. सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्गात शिवसेना आणखी मजबूत करणार,” असा विश्वास व्यक्त केला.
या ‘मातोश्री’ बैठकीनंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येणाऱ्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गट आक्रमक मोडमध्ये जाणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या जान्हवी सावंत,बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, रुपेश राऊळ, संग्राम प्रभुगावकर,हरी खोबरेकर, कृष्णा धुरी, सचिन कदम,प्रथमेश सावंत, जयेश नर,नंदू शिंदे, चंद्रकांत कासार, गणेश गावकर,उत्तम लोके,रवींद्र जोगल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे,योगेश धुरी,बाबी जागी,संजय गवस, नितीन वाळके,राजू राठोड,तपस्वी मयेकर,महेंद्र म्हाडगुत,बाळा गावडे,अवधूत मालणकर, दिनेश चमणकर,वैदेही गुडेकर,सुशील चिंदरकर,समीर लब्दे, रुपेश आमडोस्कर, अमर घाडी,अमोल वस्त,स्वप्नील आचरेकर,सुहास गावडे व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.



