कोलगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी मनोहर ठिकार व चंद्रकांत सावंत यांची बिनविरोध निवड!

सावंतवाडी : येथील कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, कोलगावच्या तज्ज्ञ संचालकपदी मनोहर उर्फ पपू ठिकार आणि चंद्रकांत सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, नवनिर्वाचित संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नूतन तज्ज्ञ संचालक मनोहर ठिकार आणि चंद्रकांत सावंत यांचा गौरव करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान संचालक मेघशाम काजरेकर यांच्या हस्ते दोन्ही नवनिर्वाचित संचालकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, संदीप गवस, सोसायटीचे चेअरमन वीरेंद्र धुरी, संचालक शुभांगी घोगळे, सलमा बेगम, लक्ष्मण राऊळ, रामचंद्र पालव आणि बाबुराव चव्हाण, सचिव रामा म्हसकर, हरिश्चंद्र सावंत, गोपाळकृष्ण फोंडबा यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि सोसायटीचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नवनियुक्त तज्ज्ञ संचालकांच्या अनुभवाचा फायदा भविष्यात सोसायटीच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी निश्चितपणे होईल, असा विश्वास यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles