सकाळी सकाळीच धडधड वाढवणारी बातमी! – आजही पेट्रोल – डिझेलचे भाव वाढले.

सावंतवाडी : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा भारतावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. भारतात तेल, पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. आता, आज 24 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किती वाढ झाली आहे? हे जाणून घेऊया.

रविवार, २४ मे रोजी तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. यापूर्वी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर काही शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११० रुपयांच्याही पुढे गेला होता. शनिवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ०.८७ रुपये आणि डिझेलच्या दरात ०.९१ रुपयांची वाढ केली होती.

विविध शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय? 

नवी दिल्ली – ९९.५१ रुपये

कोलकाता – ११०.६४ रुपये

नोएडा – ९९.५१ रुपये

त्रिवेंद्रम – ११२.६४ रुपये

विशाखापट्टणम – ११३.५३ रुपये

लखनौ – ९९.२८ रुपये

पाटणा – ११०.४९ रुपये

डिझेलचे दर काय आहेत? 

दिल्ली – ९२.४९ रुपये

कोलकाता – ९७.०२ रुपये

नोएडा – ९२.८४ रुपये

त्रिवेंद्रम – १०१.५५ रुपये

विशाखापट्टणम – १०१.२७ रुपये

लखनौ – ९२.६४ रुपये

पाटणा – ९६.५३ रुपये.

१० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल सुमारे ५ रुपयांनी महागले –

१५ मे पासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पहिल्यांदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर ३-३ रुपयांनी वाढवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दरवाढ झाली. अवघ्या १० दिवसांत पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ५ रुपयांनी महाग झाला आहे. डिझेलच्या किमतीतही एवढीच वाढ पाहायला मिळाली आहे.

कच्च्या तेलामुळे वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर –

युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा दर ७० डॉलरच्या आसपास होता. पण युद्ध सुरू होताच तो गगनाला भिडला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेला आहे. महागड्या कच्च्या तेलामुळे तेल विपणन कंपन्यांना देशांतर्गत स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे भाग पडले आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तेल कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एका अहवालानुसार, दरवाढ होण्यापूर्वी तेल कंपन्यांना १००० कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागले होते.

सरकार काय करत आहे?

कच्च्या तेलाच्या किमतीचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने ७६ दिवस इंधनाच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. याशिवाय, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कातही प्रत्येकी १० रुपयांची कपात केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles