कोलझरच्या मोहिनी देसाई यांचे निधन. ; देसाई परिवारासह गावावर शोककळा.

दोडामार्ग : तालुक्यातील कोलझर गावचे ज्येष्ठ व माजी पोलीस पाटील श्री. मोहन चंद्रोबा देसाई यांच्या पत्नी सौ. मोहिनी मोहन देसाई यांचे सोमवार, दि. २ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कोलझर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

सौ. मोहिनी देसाई या शांत, मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या निधनाने देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्यावर आज, बुधवार दि. ३ जून रोजी सकाळी ११ वाजता कोलझर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनामुळे कोलझरसह दशक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles