भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले. ; रशिया पाकिस्तान यांच्यात थेट करार!

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यात खास मैत्री आहे. अनेक वर्षांची आहे. भारताला ज्या ज्यावेळी रशियाची मदत लागली, त्यावेळी रशिया कायमच भारताच्या मदतीला आला. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताच्या मागे खंबीरपणे रशिया उभा होता. भारताने रशियाला मदत केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील दुसरा नंबरचा देश आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी भारतासोबत मोठे करार केले. हेच नाही तर पुतिन आणि नरेंद्र मोदी एकत्रच चीनच्या दाैऱ्यावर गेले होते. पाकिस्तानला सुरूवातीपासूनच भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अजिबातच पटत नाही. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सतत पाकिस्तान करत आहे. शेवटी पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश आले. थेट मोठा करार रशिया आणि पाकिस्तानमध्ये झाला. हा भारताला मोठा धक्का म्हणावे लागेल. रशियासोबत पाकिस्तानने एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने म्हटले की, अवैध स्थलांतर आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार आहे. याबाबत सहमती झाली. पाकिस्तान आणि रशियात करार झाला.

गृहमंत्री मोहसिन नक्वी बिश्केक येथे दाखल झाले, तर रशियन बाजूने व्लादिमीर कोलोकोल्त्सेव उपस्थित होते. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांमध्ये अवैध नागरिकांचे प्रत्यावर्तन, घुसखोरीला आळा घालणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी बिश्केक यावेळी उपस्थित होते. रशियाकडून व्लादिमीर कोलोकोल्त्सेव उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles