सिंधुदुर्गच्या कन्येचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! ; मानसी परब-राणे यांना ‘सर्वोत्तम कार्य गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान. ; उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल, ठाणे येथे मानाच्या पुरस्काराने सन्मान, मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न.

ठाणे/सिंधुदुर्ग : सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्याच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्गच्या कन्या सौ. मानसी परब-राणे यांना युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन (रजि.) आणि आंबोली टुरिझम, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान सोहळा – ठाणे २०२६’ मध्ये ‘सर्वोत्तम कार्य गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात झालेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यात समाजहितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय योगदान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून निर्माण केलेला ठसा याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मानसी परब-राणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशनने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली होती.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व कॉमेडियन दिलीप केदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेविका रेखा राजन चौधरी (कल्याण-डोंबिवली), पंचायत समिती सभापती खंडूजी भुकन, अभिनेते दिगंबर गरुड, जयश्री एग्रो सिडलिंगचे संचालक गणपतराव शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा समृद्धी पब्लिकेशनचे संचालक प्रा. डॉ. बी. एन. खरात होते. तर आंबोली टुरिझम, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत यांनी निमंत्रक म्हणून विशेष भूमिका बजावली.
या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मानसी परब-राणे यांचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मानसी परब-राणे यांनी हा सन्मान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा असल्याचे सांगत भविष्यातही अधिक जोमाने सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान मानसी परब-राणे यांच्या यशाने सिंधुदुर्गची मान पुन्हा एकदा उंचावली असून एका प्रामाणिक कर्तृत्वाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles