म्हापण, : आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १७ जून रोजी सकाळी ९ वाजता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर पाट भैरव मंदिराजवळील मतकरीवाडी, पाट येथील आदिशक्ती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांसाठी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन, कान-नाक-घसा, नेत्ररोग, दंतचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग तसेच बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार ईसीजी, मधुमेह तपासणी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्याही करण्यात येतील.
आयोजकांनी परिसरातील सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले आभा कार्ड, आधार कार्ड तसेच आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणावा.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ८३९०००५९९४ किंवा ७७९८२९४०४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.



