समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रोटरीचे कार्य पोहोचवू! : प्रवीण परब. ; रोटरीच्या नूतन अध्यक्ष पदी प्रवीण परब, सचिव पदी सुहास सातोस्कर तर खजिनदार पदी प्रदीप शेवडे.

सावंतवाडी : रोटरी क्लब सावंतवाडीच्या २०२६-२७ या वर्षांकरिता अध्यक्षपदी रो. प्रवीण परब, सेक्रेटरी रो. सुहास सातोसकर, खजिनदार रो. प्रदीप शेवडे यांची निवड करण्यात आली असून सोमवारी ६ जुलै रोजी पदग्रहण सोहळा मळगाव भगवती हॉल येथे संपन्न होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रो. भांबुरे म्हणाले, माझा रोटरी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून मागच्या वर्षभरात ३३ उपक्रम आम्ही राबविले. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, विद्यार्थांसाठी विविध उपक्रम आदी अनेक राबविण्यात आले. रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी, इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष रो. प्रवीण परब म्हणाले, रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदाचा १ जुलै ते ३० जून २०२७ साठी आम्ही कार्यभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ५४ वर्ष आमचा क्लब कार्यरत असून समाजाच्या शेवटच्या वंचित, उपेक्षित घटकांपर्यंत पोहचून काम करण्याचा आमचा मानस आहे‌. वाचन संस्कृती वाढविण्यासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर सामाजिक उपक्रम राबविण्यावर आमचा भर राहणार आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्यांचे व्याख्यान सावंतवाडी व दोडामार्ग भागात आयोजित करण्याचा मानस आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव रो. सुहास सातोसकर, खजिनदार रो.प्रदीप शेवडे, रो. अनंत उचगावकर, रो. सत्यजित धारणकर, रो. सुधीर नाईक, रो. ॲड. जायबा धुरी, रो. आबा कशाळीकर आदी रोटरी क्लब सावंतवाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles