“वादळाने उद्ध्वस्त संसार… भाजपची मदतीची हाक ठरली आधार!” ; चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक यांची तातडीची धाव! ; पत्रे व कौलांचे वितरण करून दिला दिलासा.

सावंतवाडी : चौकुळ–बेरडकी परिसरात धडकलेल्या चक्रीवादळाने अनेक कुटुंबांच्या संसारावर अक्षरशः घाव घातला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छप्परे उडाली, पत्रे आणि कौलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांवर संकटाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी भारतीय जनता पार्टीने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आणि आपत्तीग्रस्तांच्या चेहऱ्यावर दिलास्याचे हास्य फुलवले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने घरांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पत्रे व छपरासाठी कौलांचे वितरण करण्यात आले.

अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांना पुन्हा उभारी देण्यासाठी केलेल्या या मदतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधींनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले.

यावेळी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, अच्युत गावडे, दयानंद गावडे तसेच चौकुळ गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकटाच्या काळात दिलासा देणारा मदतीचा हातच खरा आधार असतो, याची प्रचिती भाजपच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा चौकुळ–बेरडकी परिसरातील नागरिकांना आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles