मोठी बातमी! – विमान कोसळून १० जणांचा जागीच मृत्यू. ; एका क्षणात आनंदी वातावरण शोकाकुल!

नासाऊ- बहामास : कॅरिबियन बेटांवर असलेला बहामास देशातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. बहामासमध्ये शुक्रवारी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देशात एकीकडे 53 वा सातंत्र्यदिन साजरा होत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर सरकारने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. बहामास सरकारने ‘फ्लेमिंगो एअर’ची सर्व विमाने उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहे. विमान अपघात हा बहामासची राजधानी नासाऊजवळील उत्तर अँड्रोसजवळ झाल्याची माहिती हाती आली आहे.

स्वातंत्र्यदिन साजरा करताना विमान अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी करण्यात येत आहे.

देशातील आनंदी वातावरण शोकाकुल –

पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटलं की, ‘आज सर्व एकत्र दु:खद प्रसंगाला सामोरे जात आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात मग्न होता. त्याच दिवशी अपघात होऊन आनंदी वातावरण शोकाकुल झालं आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्ती पुन्हा कधी येऊ शकणार नाही. प्रत्येक कुटुंबाप्रती आमच्या मनपूर्वक संवेदना आहेत’.

विमानतळावरून उड्डाण घेताच भयंकर घडलं –

बहामास विमान अपघात तपास प्राधिकरणाने या घटनेशी निगडीत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अपघातग्रस्त विमान हे नोंदणीकृत असून ते Cessna 402 प्रकाराचे विमान होते. या विमानाने नासाऊच्या लिंडन पिंडलिंग इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही क्षणात अँड्रोसजवळ दुर्घटना घडली. या अपघातानंतर बहामासचे ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कठोर कारवाई केली हे. त्यांनी ‘फ्लेमिंगो एअर’चे एअर ऑपरेटर सर्टिफिकेट निलंबित केलं आहे. विमान वाहतूक मंत्री जोबेथ कोल्बी-डेव्हिस यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘शुक्रवारी एकाच दिवशी फ्लेमिंगो एअरलाइन्समध्ये सुरक्षेच्या दोन मोठ्या चुका घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट रद्द केलं आहे’.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles