Big Breaking – उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार?, तब्बल १५ आमदार फुटणार? ; ऑपरेशन टायगरबाबत केंद्रातील नेत्याचा मोठा दावा.

पुणे : उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या सहाही खासदारांवर ठाकरे यांनी कारवाईसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नाहीत, त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी तिसरा आणि सर्वात जबरदस्त झटका बसणार असल्याचं समोर आलं आहे. केंद्रातील एका बड्या नेत्याने पुण्यात मीडियाशी संवाद साधताना ठाकरे गटाचे 14 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. म्हणजे ठाकरे गटाचे निम्म्याहून जास्त आमदार फुटणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हा दावा केला आहे. आठवले काल पुण्यात होते. मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनडीएकडे अनेक खासदार येत आहेत. आम्ही पक्ष फोडत आहोत असं म्हणणं चुकीचे आहे. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे खासदार आता आले आहेत. त्यांना खासदार सांभाळता येत नाहीत. टायगर ऑपरेशन वगैरे काही नाही. त्याचे ऑपरेशन आहे. एकनाथ शिंदे खरे शिवसेना नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार डावलून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे गेले. ते महायुती सोबत आले नाहीत. उद्भव ठाकरे यांच्या कडील 20 आमदारां पैकी 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचे आमदार – खासदार आमच्याकडे आले तर स्वागत आहे, एकनाथ शिंदे यांना विचारून निर्णय घेऊ, असं सांगतााच देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत केंद्रात येणार नाहीतय. फडणवीस सर्व घटकांना न्याय देत आहेत. त्यांची आता दिल्लीत आवश्यकत नाही, असं आठवले म्हणाले.

भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यावरही आठवले यांनी मत व्यक्त केलं. जिल्ह्यात अनेक स्थानिक वाद असतात. एकनाथ खडसे सीनियर नेते आहेत. त्याचा अमृत महोत्सव आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. ते सीनियर नेते आहेत. त्यांची दिल्लीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना पक्षात घ्यावे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles