मोठी बातमी! – आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच… ; अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अलीकडे काही घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून अध्यक्ष निवडीसंदर्भात नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा राष्ट्रवादीत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत.

दरम्यान, येत्या 22 जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांकडून आमदार आणि पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे समोर आले आहे.

जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच प्रचार साहित्य आणि बॅनरमध्ये एकाच प्रकारचा फोटो वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच कार्यक्रमांचे जिओ टॅगिंग करण्यासही सांगण्यात आले आहे. या सूचनांबाबत काही आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles