वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी कागदपत्रांचे २०,२१ जुलै रोजी प्रदर्शन. ; संस्थेचे अध्यक्ष खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.

वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष खासदार मा. विनोद तावडे साहेब यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त “मोडी लिपी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन” सोमवार दिनांक २० व मंगळवार दिनांक २१ जुलै रोजी करण्यात आले आहे.
या प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २० रोजी सकाळी १० वा. संस्थेचे पदाधिकारी व महाराष्ट्र शासन, पुराभिलेख संचालनालयाचे
श्री.गणेशकुमार वि. खोडके
(सहाय्यक संचालक, कोल्हापूर पुरालेखागार), श्री. विक्रम म. ठमके (संशोधन सहाय्यक, पुणे पुरालेखागार) हे अधिकारी आणि श्री. रोहित मा. जाधव,
श्री. रोहित अ. खोले व श्री.सतिश यादव हे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
या मोडी लिपी कागदपत्रांच्या प्रदर्शनाचा लाभ वैभववाडीसह जिल्ह्यातील नागरिकांना घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण व इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles