सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, केक कापून वाढदिवस साजरा करणे तसेच वृक्ष वाटप अशा उपक्रमांद्वारे वाढदिवस उत्साहात साजरा होणार आहे.
सकाळी ठीक ९ वाजता सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता आमदार दीपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात येणार असून उपस्थितांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.



