कणकवली महाविद्यालयात इतिहास मंडळाचे उद्घाटन!

कणकवली :  येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतेच इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या इतिहास मंडळाचे उद्घाटन आनंदीबाई रावराणे वरिष्ठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते. यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ.सोमनाथ कदम, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शामराव दिसले,प्रा. डॉ. मारोती चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्रा. एस . एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ‘इतिहास विभागाचे विद्यार्थ्यांनी परिसरातील ऐतिहासिक स्मारकांना भेटी देऊन इतिहास जतन करावा, असे आवाहन केले.
या निमित्ताने प्र. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी इतिहास विभागाचे अभिनंदन केले इतिहास हा विषय भूतकाळातील घटनांच्या आधारे वर्तमान काळात प्रेरणा देत असतो. विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदेश कदम यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत इतिहास मंडळाचे अध्यक्ष भाग्येश कांबळे यांनी केले व शेवटी आभार माही नयानी हिने मानले. यावेळी इतिहास मंडळाचे मंडळाचे विद्यार्थी ऋतिक सावंत, वैदेही गुने, निधी पालव, खुशी भोसले, प्रेरणा जाधव, गीता गोसावी, पल्लवी मानगावकर, विकांत बाईत, प्रेम भामले, प्रतीक चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles