माहितीच्या अधिकारातून जनहिताचा आवाज बुलंद करणाऱ्या सुशिल चौगुले यांचा भव्य गौरव! ; माहिती अधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे सावंतवाडीत सन्मान!

सावंतवाडी : माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नसून प्रशासनात पारदर्शकता आणि जनतेच्या हक्कांचे संरक्षण करणारे प्रभावी माध्यम आहे. या कायद्याचा प्रभावी वापर करत सातत्याने जनहिताच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे माजगाव (ता. सावंतवाडी) येथील माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे सावंतवाडी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण व्हावी, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी आणि शासनाच्या विविध यंत्रणांकडून आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुशील चौगुले हे सातत्याने माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यातून अनेक जनहिताच्या विषयांना दिशा मिळाली असून, माहिती अधिकाराच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग अधिक सक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

या उल्लेखनीय योगदानाबद्दल कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान केला. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, मुख्याध्यापक संघाचे रामचंद्र घावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सुशील चौगुले यांच्या माहिती अधिकार क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत, जनतेच्या हक्कांसाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा प्रकारचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

या सन्मानामुळे माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनहितासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार असून, चौगुले यांच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles