आत्मघाती ब्लास्ट, सात ठार तर १८ जण जखमी.

स्वात : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांना टार्गेट करीत झालेल्या आत्मघाती ब्लास्टमध्ये सात जणांचा मृ्त्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोट झाला तेव्हा स्वात जिल्ह्यातील एका शहरात शांतता रॅली सुरु होती. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला आत्मघाती हल्ल्यासारखा होता, मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. एका हल्लेखोरांची तपासणी सुरु असताना त्याने त्याच्या अंगावरील स्फोटकांचा स्फोट केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. या घटनास्थळावरुन पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे.

पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याबाहेर हा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून त्यात नऊ जण ठार झाले आहेत. स्वात जिल्हा पोलीस अधिकारी उमर खान यांनी डॉन न्यूजला सांगितले की, जेव्हा पोलीस अधिकारी संशयिताला पोलीस ठाण्याच्या गेटवर थांबवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी त्याने हा स्फोट घडवल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles