कोमसाप सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात पार पडली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षात झालेल्या जमाखर्चास मान्यता देण्यासह पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, साहित्य संमेलनांसह दरवर्षी होणारे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.‌ याप्रसंगी जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, सौ. उषा परब, प्रा. सुभाष गोवेकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुस्मिता चव्हाण, विजय देसाई, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, अभय नेवगी, संतोष पवार, प्रा. गणपत शिरोडकर, ॲड.अरूण पणदूरकर, प्रा.एस. एन. मुक्कनवार, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर, मीरा कासार आदी उपस्थित होते.
यावेळी वार्षिक सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम वाचन मंदिरचे तसेच उपस्थित सर्वांचे अभिमन्यू लोंढे यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles