सावंतवाडी : आज सावंतवाडी शहरात अत्यंत दिमाखदार अशा हर घर तिरंगा रॅलीचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक पर्वासाठी सहकार्य करणाऱ्या साऱ्यांचे भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात श्री परब म्हणतात –
“आज सावंतवाडी शहराने ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य-दिव्य आणि अविस्मरणीय ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा ऐतिहासिक क्षण अनुभवला. हजारो हातांत डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर घुमणारा *‘वंदे मातरम्’*चा जयघोष आणि प्रत्येक हृदयात जागलेली राष्ट्रभक्ती… या अद्भुत वातावरणाने संपूर्ण सावंतवाडी नगरी अक्षरशः राष्ट्रप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली!” 🇮🇳
“या राष्ट्राभिमान जागविणाऱ्या आणि देशप्रेमाची ज्योत प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या या भव्य उपक्रमासाठी आम्हाला प्रेरणा, मार्गदर्शन आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार!”
“या उपक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टी तसेच मित्रपक्षांच्या तमाम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे, तसेच सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील माझ्या तमाम नागरिक बंधू-भगिनींचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक आभार!”
“या रॅलीला अभूतपूर्व यश मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण मी मनापासून मान्य करतो. तिरंगा हातात घेऊन या राष्ट्रभक्तीच्या प्रवाहात सहभागी झालेला प्रत्येक हात आणि देशप्रेमाने भारावलेले प्रत्येक हृदय हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे.”
तसेच, या भव्य सोहळ्याची जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोच निर्माण करून देणाऱ्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील सर्व पत्रकार बांधवांचे, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आणि मीडिया प्रतिनिधींचे विशेष आभार. आपल्या लेखणीने, कॅमेऱ्याने आणि माध्यमातून या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्याला व्यापक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आपले योगदान सदैव स्मरणात राहील.
माझ्या भारतीय जनता पार्टीतील तमाम सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या संपूर्ण आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार. आपल्या अथक परिश्रमामुळे, शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि एकजुटीच्या बळावर आजचा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी होऊ शकला.
आज सावंतवाडीने केवळ एक रॅली काढली नाही, तर राष्ट्रभक्तीची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि तिरंग्याप्रती असलेला अभिमान यांचे विराट दर्शन घडविले. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.
हा उत्साह, ही ऊर्जा, ही एकजूट आणि हे राष्ट्रप्रेम असेच अखंड राहो, हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना! 🇮🇳
यापुढेही सावंतवाडी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि समाजहिताचे असेच नाविन्यपूर्ण, भव्य-दिव्य व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यासाठी आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य यापुढेही असेच लाभत राहील, असा मनोमन विश्वास व्यक्त करतो.
“पुनश्च एकदा… या ऐतिहासिक ‘हर घर तिरंगा’ रॅलीला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक, मनस्वी आणि ऋणानुबंध जपणारे आभार!”
🇮🇳 भारत माता की जय!
🇮🇳 वंदे मातरम्!
🇮🇳 जय हिंद!
🙏आपलाच,🙏
श्री विशाल प्रभाकर परब.
युवा नेते, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य.



