सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत २८२ शिक्षक पदांची भरती ; पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया. ; १३ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्गनगरी : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण 282 शिक्षक पदे उपलब्ध करण्यात आली आहेत.

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’ ही ऑनलाइन चाचणी 29 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. चाचणीमध्ये प्राप्त गुण, उपलब्ध रिक्त पदे आणि शासनाच्या नियमानुसार आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या Education Officer Primary SINDHUDURG (Primary) – Without Interview या व्यवस्थापनाच्या शाळांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस 21 जुलै 2026 रोजी मान्यता देण्यात आली असून, ती 6 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गासह विविध आरक्षण प्रवर्गांचा समावेश आहे. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आदी समांतर आरक्षणाचाही विचार करण्यात आला आहे.

दिनांक 13 ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक असल्याने, पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर पदनिहाय प्राधान्यक्रम नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करावेत.

उमेदवारांना 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण करावी.

उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय शिक्षक पदभरतीसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अंतिम प्राधान्यक्रम नोंदविण्यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली पदांची संख्या, विषय व पदनिहाय तपशील, आरक्षण, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच इतर अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासाव्यात. पवित्र पोर्टलवरील संबंधित जाहिरातीत नमूद केलेली माहितीच अंतिम राहणार आहे. पदभरती प्रक्रियेबाबत काही आक्षेप किंवा अडचणी असल्यास उमेदवारांनी आपले म्हणणे [email protected] या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles