श्री देव पाटेकर चरणी सेवा! ; उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन. युवा रक्तदाता संघटना व मित्रपरिवाराचा उपक्रम, राजवाडा बँक्वेट हॉल येथे दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसाद.

सावंतवाडी : सावंतवाडीकरांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या श्री देव पाटेकर यांच्या चरणी श्रावणी सोमवारनिमित्त सालाबादप्रमाणे सेवा अर्पण करण्यात येणार आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी व समस्त मित्रपरिवाराच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत राजवाडा बँक्वेट हॉल येथे हा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री देव पाटेकरांच्या चरणी भक्तिभावाने सेवा अर्पण करण्यासोबतच भाविकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री. देव्या सूर्याजी यांनी केले आहे.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र पर्वात सावंतवाडीकरांचे आराध्य दैवत श्री देव पाटेकर यांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची परंपरा युवा रक्तदाता संघटना व मित्रपरिवाराने यंदाही जपली आहे. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या महाप्रसादाच्या उपक्रमातून घडणार आहे.

या उपक्रमासाठी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे बाळराजेसाहेब सावंत भोसले व कुटुंबीय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.

तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा रक्तदाता संघटना व समस्त मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles