बिरोडकर टेंबचे लाडके ‘भाऊ’ हरपले! ; ज्येष्ठ नागरिक गंगाराम उर्फ भाऊ बिरोडकर यांचे निधन. ; मनमिळाऊ स्वभावाचे लाडके व्यक्तिमत्व हरपले.

सावंतवाडी : न्यू सबनिसवाडा-बिरोडकर टेंब येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तथा बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार गंगाराम उर्फ भाऊ सखाराम बिरोडकर यांचे आज दुपारी १ वाजता वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते आजारी होते. अर्धांगवायूच्या आजाराशी झुंज देत असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गंगाराम बिरोडकर हे गोविंद चित्र मंदिर येथे सुरुवातीच्या काळापासून सेवेत कार्यरत होते. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. मनमिळाऊ, प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावामुळे बिरोडकर टेंब परिसरात ते सर्वांचे लाडके ‘भाऊ’ म्हणून परिचित होते.
सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला-क्रीडा क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने परिसरातील सामाजिक व कला-क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
ते दै. तरुण भारतचे कर्मचारी वैभव बिरोडकर, रिक्षा व्यावसायिक हेमंत बिरोडकर आणि फोटोग्राफर प्रशांत बिरोडकर यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. भाऊ बिरोडकर यांच्या निधनाने बिरोडकर टेंब परिसराने एक प्रेमळ, मनमिळाऊ आणि आधारवड व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles