सावंतवाडी-आंबोली महामार्गावर रंबलर बसवा! ; माडखोल ग्रामस्थांची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी.

✍️ लखन आडेलकर.

माडखोल : सावंतवाडी-आंबोली महामार्ग क्रमांक 548 H वरील सापळेस्टॉप ते धवडकी या परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी एकूण आठ ठिकाणी रंबलर बसविण्यात यावेत, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत माडखोल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडीचे शाखा अभियंता रुपेश कांबळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.

माडखोल गावातील फुगीवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय तसेच बाजारपेठ असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्याचबरोबर आंबोली या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या मार्गावरील वाहतूकही वाढली आहे. परिणामी फुगीबाजार परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असून, गेल्या तीन महिन्यांत या ठिकाणी पाच ते सहा अपघात झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.

याच महामार्गालगत शाळा, महाविद्यालय तसेच दत्त मंदिर असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागतो. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी योग्य ठिकाणी रंबलर बसविणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी अभियंता कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच गणेशोत्सवापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाढलेली झाडी व गवत काढण्यात यावे आणि आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

यावेळी शाखा अभियंता श्री. कांबळे यांनी पावसाळा संपल्यानंतर रंबलर बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच महामार्गालगतची झाडी व गवत काढण्याचे काम दि. 8 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले यावेळी उपसरपंच दत्ताराम कोळमेकर, माजी सरपंच संजय शिरसाट, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुका प्रमुख वासुदेव होडावडेकर,जीवन केसरकर , लखन आडेलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles