_नाना… पडद्यावरचा वादळमाणूस, मनामनांतला आपलाच माणूस!_
_“आ गए मेरी मौत का तमाशा देखने…”_ या एका संवादापासून ते असंख्य मनांच्या डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या अंतिम निरोपापर्यंत… नाना म्हणजे अभिनयाचा धगधगता अंगार!
“आ गए मेरी मौत का तमाशा देखने!…
अब मुझे लटका देंगे!…
जुबान ऐसी बाहर आएगी, आँखे बाहर आएँगी!…
थोड़ी देर लटकता रहूँगा… फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा…
*फिर आप चर्चा करते हुए घर चले जाओगे… खाना खाओगे… सो जाओगे…”
हा केवळ संवाद नव्हता…
तो नानांच्या अभिनयातून उमटलेला एक काळजाचा ठोका होता!
संवाद संपला की पडद्यावर काही क्षण शांतता पसरायची;…. पण त्या शांततेतही नानांचा आवाज कानात घुमत राहायचा. *त्यांच्या डोळ्यांतला आक्रोश, आवाजातील धार, चेहऱ्यावरचा संताप आणि शब्दांमागची जळजळ…* हे सगळं एकत्र येऊन नाना पाटेकर नावाच्या अभिनेत्याला अभिनयाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेले.
आज नाना नाहीत, ही जाणीव स्वीकारताना मन वारंवार एकच प्रश्न विचारतंय…
“ज्याच्या संवादांनी लाखो हृदयांना आवाज दिला,
तो आवाज आज एवढा शांत कसा झाला?”
नाना गेले…
पण त्यांचा आवाज गेला नाही.
त्यांची पात्रं गेली नाहीत.
त्यांची नजर गेली नाही.
त्यांचा राग, त्यांची तळमळ, त्यांची माणुसकी आणि त्यांच्या अभिनयाची ती धग…
ही तर कायमची आपल्या स्मरणात कोरली गेली आहे.
_“पडदा पडला, भूमिका संपली,
पण कलाकार मात्र मनात जिवंत राहिला…
काळ पुढे सरकत राहील,
पण नानांचा आवाज काळाच्या कानात घुमत राहील…”
नाना पाटेकर म्हणजे केवळ एक अभिनेता नव्हता; ते एक अभिनयाचं विद्यापीठ होते. त्यांनी अभिनय केला नाही, त्यांनी पात्रांना जगवलं. पडद्यावरचा प्रत्येक माणूस हा नाना स्वतः बनून जगायचे. म्हणूनच अंकुशमधला आक्रमक तरुण असो, प्रहारमधला शिस्तप्रिय सैनिक असो, क्रांतिवीरमधला संघर्षशील नायक असो, तिरंगा, यशवंत, अंगार, परिंदा, प्रतिघात, थोडासा रूमानी हो जाएँ, राजू बन गया जंटलमन, गुलाम-ए-मुस्तफा, अग्निसाक्षी, वजूद, अब तक छप्पन किंवा वेलकम मालिकेतील उदय शेट्टी…
प्रत्येक भूमिकेत नाना दिसले नाहीत; ती भूमिका नानांमध्ये दिसली!
त्यांच्या अभिनयात एक विलक्षण गोष्ट होती…
ते संवाद बोलत नसत… संवाद जगत असत!
त्यांच्या एका नजरेत कथा असायची, एका विरामात भावना असायची आणि एका वाक्यात संपूर्ण समाजाला आरसा दाखवण्याची ताकद असायची.
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याशी नानांच्या अभिनयाची तुलना अनेकदा केली गेली. तुलना करणे कदाचित योग्य-अयोग्य यापलीकडचा विषय आहे; कारण दोघांनीही भारतीय सिनेमाला अविस्मरणीय योगदान दिले. मात्र नानांच्या अभिनयाची जातच वेगळी होती. त्यांच्या अभिनयात कृत्रिम आवेश नव्हता; तो माणसाच्या आतून उसळणारा ज्वालामुखी होता.
मराठी मातीत जन्मलेला हा कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत गेला; पण मराठी मातीची ओल, मराठी माणसाची संवेदना आणि समाजाकडे पाहण्याची चिकित्सक नजर त्याने कधीच सोडली नाही.
चंदेरी दुनियेत झगमगाट असतानाही सामाजिक वास्तवाची जाणीव जपणारा कलाकार म्हणून नानांचं स्थान वेगळंच होतं. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज, शेतकरी, गरिबी, संघर्ष, राजकारण आणि माणुसकी याबद्दल आपली भूमिका सातत्याने मांडली.
राजकारण्यांना कानपिचक्या देताना ते कोणाची भीती बाळगत नसत…
आणि गरज पडली तेव्हा सामान्य माणसाच्या वेदनेवर फुंकर घालायलाही ते मागे हटत नसतं.
नाना म्हणजे बेधडकपणा होता…
नाना म्हणजे बिनधास्तपणा होता…
नाना म्हणजे माणसाच्या वेदनेशी असलेली नाळ होती…
आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्याची बातमी ही केवळ एका कलाकाराच्या निधनाची बातमी वाटत नाही.
जणू आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस उठून निघून गेला आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे.
हे भाग्य प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला येत नाही.
“काही माणसं जातात तेव्हा घर रिकामं होतं, काही जातात तेव्हा गाव पोरकं होतं..
पण काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी जातात तेव्हा एक संपूर्ण संस्कृतीच थोडीशी अनाथ होते…”
नाना त्यापैकीच एक होते.
अजातशत्रू म्हणावा असा हा माणूस!
ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी टीका केली, ज्यांनी चिखलफेक केली, त्यांनाही माफ करण्याची ताकद नानांच्या व्यक्तिमत्त्वात होती. कारण मन मोठं असेल तर राग फार काळ टिकत नाही, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं.
त्यांच्या जाण्याने आज सिनेरसिकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे… नानांनी आपल्याला असंख्य आठवणी दिल्या आहेत.
कधी अंकुशमधून अंगावर शहारे आणले,
कधी प्रहारमधून शिस्त शिकवली,
कधी क्रांतिवीरमधून संघर्षाची ज्वाला पेटवली,
कधी अब तक छप्पनमधून पोलिस अधिकाऱ्याची मानसिकता उलगडली,
तर कधी वेलकममधील उदय शेट्टी बनून आपल्या चेहऱ्यावर खळखळून हसू फुलवलं.
एका कलाकाराने एवढ्या टोकाच्या विविध भूमिका इतक्या सहजतेने साकाराव्यात, हीच त्यांच्या प्रतिभेची खरी उंची!
नाना गेले असतील…
पण त्यांचा अभिनय अजूनही पडद्यावर आहे.
त्यांचा आवाज अजूनही कानात आहे.
त्यांचे संवाद अजूनही ओठांवर आहेत.
त्यांची पात्रं अजूनही आपल्या स्मरणात आहेत.
आणि म्हणूनच—
“मृत्यू देहाचा होतो, कलेचा कधीच होत नाही…
*कलाकार निघून जातो, पण त्याचा आवाज फक्त काळाच्या पल्याड जातो…”
नाना पाटेकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. अभिनय, सामाजिक भान, परखड विचार, माणुसकी आणि मराठी मातीशी असलेली नाळ—या सगळ्यांचा अद्भुत संगम असलेलं हे व्यक्तिमत्त्व पुन्हा निर्माण होणं कठीण आहे.
आज शब्द अपुरे पडत आहेत…
डोळ्यांत पाणी आहे…
मनात असंख्य आठवणी आहेत…
निःशब्द…!
फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं—
*“नाना, पडदा पडला आहे…पण तुमची भूमिका संपलेली नाही…*
कारण आमच्या मनाच्या रंगमंचावर
तुम्ही कायमचे नायक राहणार आहात!”
मिस यू नाना…! 😔
मराठी मातीच्या या असामान्य, कसदार आणि दमदार कलाकाराला—
अभिनयसम्राटाला, संवेदनशील माणसाला, परखड विचारवंताला आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला माझी विनम्र, भावपूर्ण आदरांजली! 🙏💐
नाना… आज तुमचा आवाज थांबला असेल,
*पण तुमची गर्जना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीत सदैव घुमत राहील…!
✍️ रूपेश पाटील,
सावंतवाडी.
🙏🌸🌺🙏



