मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना आदळल्या. अनियंत्रित वेगाने येणाऱ्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिंद्रा एसयूव्हीमध्ये आग लागल्याने धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. काही जण जखमी झाले.
रात्री ३ वाजता काय घडलं?
मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री नरीमन पॉईंट वरून वरळी कडे येणाऱ्या मार्गावर सुरुवातीला 2 गाड्यांचा अपघात झाला होता. रात्री 3 च्या सुमारास झालेल्या या अपघातमुळे काही गाड्या थांबल्या होत्या. त्याच दरम्यान मागून अनियंत्रित वेगाने येणाऱ्या एका महिंद्रा एसयूव्ही कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिंद्रा एसयूव्ही मध्ये आग लागल्याने धावपळ सुरू झाली.
माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्यात आली. सुदैवाने या घटनेत सर्वजण वाचले मात्र काहींना किरकोळ जखमी झाले. मागून अनियंत्रित वेगाने एसयुने धडक देणाऱ्या एसयूव्हीचा ड्रायव्हर नशेत होता का ? याची चौकशी सुरू आहे. काल रात्री या अपघातामुळे जवळपास दीड तास वाहतूक बंद असून नंतर सुरू करण्यात आली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई स्थानिक पोलीस करत आहेत.



