रिव्हर्स मायग्रेशनचं अद्वैत बेक हाऊस उत्तम उदाहरण! : पालकमंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार!

सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व‌ बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा ताफा शनिवारी सायंकाळी सावंतवाडीत अचानक थांबला. येथील अद्वैत बेक हाऊसला त्यांनी सदिच्छा भेट देत तेथील पदार्थांचा आस्वाद देखील घेतला. यावेळी अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मंत्री श्री. राणे यांनी कौतुक केले.

मंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडीच्या अद्वैत बेक हाऊसला सदिच्छा भेट दिली. यावेळी आईस्क्रीम, केकसह विविध पदार्थांची चव देखील त्यांनी चाखली. स्थानिक युवकान निर्माण केलेला ब्रॅण्ड कौतुकास्पद असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी अद्वैतचे वडील वल्लभ नेवगी यांनी पालकमंत्र्यांच्या सरप्राईज व्हिजीटबाबत आभार व्यक्त करत माजी मुख्यमंत्री, खास. नारायण राणे यांच्या सोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला. यावेळी मंत्री नितेश राणेंकडून आता पुढची पिढी देखील हे संबंध कायम ठेवत असल्याचे उद्गार काढले.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, अद्वैत हा रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आम्ही जे वारंवार म्हणतो जिल्ह्यातल्या तरुणांनी आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन जिल्ह्याच्या अर्थकारणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, जिल्ह्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथली खाद्यसंस्कृती, भाषा या सगळ्याला प्रोत्साहन देण्याच काम आपल्या युवकांनी असंच केल पाहिजे. याच उत्तम उदाहरण अद्वैत आहे. मी सोशल मीडियावर त्याच कौतुक ऐकल होत‌, मोठमोठ्या लोकांना त्याच्याबद्दल बोलताना ऐकलं. आज स्वतः इथे आल्यानंतर विविध पदार्थ खाल्ल्यानंतर आणि चव घेतल्यानंतर मुंबई आणि पुण्याला मागे टाकेल एवढं दर्जेदार उत्पादन तो बनवत आहे. त्याच्या आई-वडिलांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत. महाराष्ट्रासह देशातल्या लोकांनी अद्वैत बेकहाऊसला नक्की भेट द्यावी असेही आवाहन श्री. राणेंनी केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, वल्लभ नेवगी, वैभवी नेवगी, अद्वैत नेवगी, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles