माऊलीच्या भक्तिभावाच्या सागरात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब झाले तल्लीन! ; सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे!

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी श्रीदेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेत जिल्ह्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि संकटांवर मात करण्याच्या सामर्थ्यासाठी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली.

सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीची जत्रा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अद्भुत संगम! लोटांगणाची जत्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवाला दरवर्षी लाखो भाविकांची श्रद्धापूर्ण पावले सोनुर्लीच्या पावन भूमीकडे वळतात. हाकेला धावणारी, संकटात भक्तांना आधार देणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून श्रीदेवी माऊलीची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

याच भक्तिमय वातावरणात शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सायंकाळी जत्रोत्सवाला भेट देत माऊलीच्या चरणी माथा टेकविला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दुष्काळासारख्या संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची ताकद माऊलीने सर्वांना द्यावी, असे भावपूर्ण साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले.

श्रद्धेच्या या पवित्र सोहळ्यात संजू परब यांच्या उपस्थितीने भक्तिभावाला अधिकच उधाण आले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माऊलीच्या चरणी नतमस्तक होत जिल्ह्याच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना… भक्तीच्या या सोहळ्यातून जनसेवेचा भावही अधोरेखित झाला!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles