श्री देवी माऊलीच्या चरणी माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक नतमस्तक! ; सोनुर्लीच्या जत्रोत्सवानिमित्त भाविकांना दिल्या मंगलमय शुभेच्छा!

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचे मंगलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. या पवित्र जत्रोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी श्री देवी माऊलीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

माऊलीच्या दर्शनाने आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेत वैभव नाईक यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत जत्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. श्रद्धा आणि भक्तीच्या या पावन सोहळ्यात त्यांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणाला अधिकच उत्साहाची किनार लाभली.

यावेळी देवस्थान समितीच्या वतीने वैभव नाईक यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. परंपरेचा वारसा जपत भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या जत्रोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माऊलीच्या दर्शनाने भक्तीचा गंध दरवळला, तर जत्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात श्रद्धेचा दीप अधिकच उजळला!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles