Big News – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाणार..?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. १३२ जागा घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे राज्यात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना आपले मत मांडले.

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही?

आमदार संजय शिरसाट म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते राज्यात येणार नाहीत. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही. या बातम्या खोट्या आहेत. तसेच माझ्याकडून मंत्री पदासाठी कुठलीही लॉबिंग होत नाही. मी केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, संजय राऊत यांनी आमची जास्त चिंता करू नये.आम्ही सक्षम आहोत. त्यांनी सिल्वर ओकला जावे. कांग्रेस सोबत जाोवून तुमचे काय हाल झाले ते पहिले आहे.

एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाही?

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? या विषयावर बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप कुणालाही दिल्लीतील नेत्यांचा फोन आला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाही. या संदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नाही. शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायचे आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles