सावंतवाडी संघाची दमदार विजयी सलामी, वेंगुर्ला संघावर मिळविला दमदार विजय.! ; मुख्यालय पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धा.

सिंधुदुर्गनगरी : येथे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ स्पर्धा रंगल्या असून सावंतवाडी विरुद्ध वेंगुर्ला सामन्यात सावंतवाडी पत्रकार संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेंगुर्ला संघाने या सामन्यात दमदार फलंदाजी करीत निर्धारित 4 षटकात तब्बल 46 धावा फटकावल्या व सावंतवाडी संघासमोर विजयासाठी 24 चेंडूत 47 धावांचे खडतर आव्हान ठेवले.

या धावांचा पाठलाग करीत सावंतवाडी संघाकडून राजारान धुरी यांनी तुफानी खेळी, सचिन रेडकर यांनी दमदार फलंदाजी केली. शेवटी अनिकेत गावडे यांच्या दोन चौकार आणि एका उत्तुंग षटकारमुळे सावंतवाडी संघाने एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळविला व दमदार आगेकूच केली आहे. दमदार फटकेबाजीमुळे वाडी संघाने हा विजय मिळविला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles