सावंतवाडी : श्री दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्याकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ”भक्तनिवास व सुशोभीकरण” काम मंजूर झालेले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आम. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
श्री एकमुखी दत्तमंदिर परिसर, सबनीसवाडा, सावंतवाडी येथे शनिवार दि. ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९.४५ वा. या सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर व्यवस्थापन उपसमिती, सबनीसवाडा सावंतवाडीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी केले आहे.