नूतन मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे ठाकरे शिवसेना पदाधिकार्‍यांनी शहरातील समस्यांकडे वेधले लक्ष.!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदच्या नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. ह्यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सौ. पाटील यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात शहरात होत असलेल्या रस्त्यांबाबत तसेच पाणीटंचाई, अनेक शहरातील ठिकाणी होत असलेली दुर्गंधी गटारे व बरेच रस्त्यांच्या खोदाईमुळे पाण्याची फुटत असलेल्या पाईप लाईन अशा सावंतवाडी शहरातील अनेक समस्यांवर नवनियुक्त मुख्याधिकारी सौ. पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली.

दरम्यान, अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर योग्यरित्या कारवाई करत सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, युवा पदाधिकारी आशिष सुभेदार, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जावेद शेख, रश्मी माळवदे, समीरा खलील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles