आंबोलीत प्रथमच ५ दिवसांच्या शास्त्रशुद्ध योग शिबिराचे आयोजन !

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोलीत प्रथमच ५ दिवसांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शास्त्रशुद्ध योग मार्गदर्शन घेऊन इच्छुक नागरिकांनी, दि.०२ मे २०२५ ते ०६ मे २०२५.
वेळ सकाळी -०६:०० ते ०८:०० या कालावधीत आंबोली, मुळवंदवाडी (गुरववाडी) उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यावेळी योगामधील विविध पदव्या संपादन केलेले योगतज्ज्ञ एकनाथ गुरव – AMc/YSA/ YAN/ YSs Diksha / MSc in Yoga science ,भरत गावडे – BSc/MSc in yoga science , प्रशांत गुरव – BSc/MSc in yoga science, कुणाल गावडे – BSc in yoga science , अक्षय गुरव – BSc/MSc in yoga science, प्रियांका गुरव – YIC उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या भव्य योग आणि आरोग्य शिबिरात योगासन आणि प्राणायाम , रोग प्रतिकार शक्ती वाढ, योगा थेरपी ,निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन,तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन,सात्विक आहार अशा विविध विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे या शिबिरासाठी फक्त २००/-प्रवेश शुल्क आकारले असून आंबोली, चौकुळ, गेळे परिसरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

प्रवेश नोंदणीसाठी 8411965948, 9421191470, 9637800456 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles