Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

बारावीचा निकाल काही तासांवर, बोर्डाच्या वेबसाईटशिवाय ‘येथेही’ निकाल पाहता येणार !

पुणे : राज्यातील बारावीचा निकाल उद्या, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 मेपासून त्यांच्या महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. आता परीक्षेच्या निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्याचा बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.

खालील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –

1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in

मंडळाच्या वेबसाईटशिवाय निकाल कुठं पाहावा?  

3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org

निकाल कसा पाहायचा? 

– सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

– होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.

– तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

– तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.

दरम्यान, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा –

दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच 15 मेच्या आधी घोषित केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मार्चमध्ये परीक्षा संपल्यानंतर आता सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाच्या तारखेवर लागले आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles