Friday, June 20, 2025

Buy now

spot_img

आज आंबोलीत रंगणार ‘जागर श्री शक्तीचा, खेळ पैठणीचा’, प्रा. रूपेश पाटील करणार मनोरंजनातून प्रबोधन.

सावंतवाडी : श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता ‘महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम’, सायंकाळी 5 वाजता प्रा. रुपेश पाटील प्रस्तुत ‘जागर श्री शक्तीचा, खेळ पैठणीचा’ हा ज्ञानातून मनोरंजन व मनोरंजनातून प्रबोधनावर आधारित हा कार्यक्रम सादर होईल. रात्री 9 वाजता वेशभूषा स्पर्धा तसेच मनोरंजनातून धमाल कॉमेडी कार्यक्रम सादरकर्ते चंद्रहास राऊळ व रात्री 10 वाजता अरुण गवंढळकर यांचा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक उद्या 12 व 13 मे 2025 रोजी हिरण्यकेशी क्रीडा मंडळ बॉक्स क्रिकेट लिंक (गावठणवाडी मर्यादित) संपन्न होणार आहे.  तरी या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दशरथ सावंत व सचिव भारत गुरव तसेच श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई व नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली – गावठणवाडी यांनी केले आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles