सावंतवाडी : श्रावणी सोमवार निमित्ताने सावंतवाडीकरांचे आराध्य दैवत श्री देव पाटेकरच्या कृपाशीर्वादाने युवा रक्तदाता संघटनेकडून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. राजवाडा येथे आज दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी दु.१ ते ३ या वेळेत बॅक्वेट हॉल येथे महाप्रसाद दिला जाणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन युवा रक्तदाता संघटना व सावंतवाडी संस्थान, युवा रक्तदाता संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्य तथा मित्रपरिवार यांनी केले आहे.
युवा रक्तदाता संघटनेकडून आज श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसादाचे आयोजन! ; राजवाडा येथे दुपारी १ ते ३ या वेळेत दिला जाणार महाप्रसाद!
0
35



