सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथील जनता विद्यालयात 1988 मध्ये एसएससी बॅच शिकून 10 वी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यानी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणीना उजाळा दिला. व्हाट्सअपच्या माध्यमातून वर्षभर एकत्रित आलेल्या या मित्र मैत्रिणी अखेर गणेश चतुर्थीच्या काळात एकत्रित येऊन आपल्या आठवणी ताज्या केल्या.
सर्वप्रथम 36 वर्षाच्या काळात आपल्या नोकरीं व्यवसायात आणि संवसारात अडकलेल्या या मित्र मैत्रिणीनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना सर्वच जण भावुक झाले. काहींनी तर विध्यार्थीदशेत अगदी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याची खंतही व्यक्त केली तर काहींनी आर्थिक परिस्थिती असून सुद्धा शिक्षणाकडे पाठ फिरवल्याने आज त्याचा पश्चाताप होत असल्याचे बोलून दाखवले. अनेकांनी आपण स्वीकारलेल्या व्यवसायात पैसा भरपूर मिळाल्याचे सांगितले मात्र जीवनातील विध्यार्थी दशेतील तो निरागस आनंद मिळाला नसल्याचे सांगितले.
आज आपणाला शिक्षणाचे महत्व पटले आहे त्यातूनच परिस्थिती मुळे आम्हाला न मिळू शकलेले शिकण आपल्या मुलांना देऊ शकलो याचं समाधान असल्याचें सांगितले. हे सांगताना काहींनी सांगितले आपल्या मुलांसाठी खुप काही करा मात्र जीव ओतून टाकू नका.सर्वच त्यांच्या स्वाधीन करू नका आपल्या साठी थोडं राखून ठेवा असे सांगितले
काहींनी तर सांगितले की त्यावेळी परिस्थिती मुळे शाळेत जाणे शक्य नव्हते तरी सुद्धा फाटक्या चड्ड्या, ठिगळे लावलेले कपडे, अनवाणी शाळेत यायचो
कुणी कुणाला हसत नव्हता कारण सर्वांच्याच चड्ड्या ठिगळ लावलेल्या असायच्या असे सांगत सर्वांच्या आठवणी ताज्या केल्या.
मात्र आता या ना त्या मार्गाने आम्ही कमावू लागलो आहोत याचा फायदा आजच्या पिढी बरोबर आमच्या मित्र मैत्रि नीना करुन धायला हवा शाळेबंद्दल शिक्षकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगून या गेट टुगेदर तुन काही चांगलं करण्याचा संकल्प करूया आपली विघ्न आपणच दूर करूया . वेळ प्रसंगी एक मेकांना मदत करूया असे सांगितले.
ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेचे आम्ही देणेकारी आहोत आणि हे देणे फेडूया असेही सांगितले
शाळेतील त्या वेळचे शिक्षक श्री कशालिकार, श्री पाटकर, श्री मालवणकर,श्री घाडी आदी सरांच्या आठवणी ताज्या केल्या.
एकुणच या गेट टुगेदर मुळे आम्हाला तो आनंद परत प्राप्त झाल्याचें सांगून वॉट्सअप ग्रुप करुन आम्हाला पुन्हा एकत्रित आणणाऱ्या वनिता मालवणकर, संजू परब, अतुल फेद्रे, संतोष आदिबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तळवडे येथील कुलकर्णी सभागृहात पार पडलेल्या या गेट टुगेदर कार्यक्रमात सौ. विनिता बगळी (पूर्वाश्रमिची वनिता मालवणकर ) गुरुनाथ परब, अतुल फेद्रे, प्रभाकर कांडरकर, श्रीकृष्ण मालवणकर, यशवंत लोके, प्रसाद फेद्रे, मनोहर साळस्कर, संजय परब, सुभाष जाधव, जतीन दळवी,महादेव दळवी, यशवंत लोके, अतुल फेद्रे, संतोष राजू, लिंगाजी सावंत आदिनी आपल्या आठवणींना उजाळा दिला सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. लवकरच आणखीन एकदा एकत्रित येण्याचे ठरविण्यात आले.
ADVT –