वेंगुर्ला : श्री देवी नाईकवस मित्र मंडळ, रेडी गावतळेवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य दीपावली शो टाईम कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट देत उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास रेडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भाई राणे, माजी उपसरपंच नामदेव राणे, तसेच मित्र मंडळाचे अध्यक्ष भगवान राणे, स्वप्नील राणे, दीपक राणे, सागर राणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी दीपावलीच्या शुभेच्छा देत विशाल परब यांनी गावातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. पारंपरिक कला, नृत्य आणि मनोरंजनाने सजलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवमय वातावरण पसरले.
स्थानिकांच्या सहकार्याने आणि उत्साहाने दीपावली शो टाईम कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


