उद्यापासून रंगणार आरपीडीचे ‘स्नेहसंगम’ वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा! ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंसह अनेक दिग्गज मान्यवरांची लाभणार उपस्थिती.

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्या दिनांक 23 व 24 डिसेंबर 2025 या दोन दिवसात विविध रंगाविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यात दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम मान्यवरांच्या हस्ते दुपारी 4 वाजता होणार आहे. तसेच हास्य, विनोद आणि व्यक्तिमत्त्वाची महती सांगणारा ‘शेलापागोटे’ हा कार्यक्रम दुपारी 3  वाजता तर विविध गुणदर्शन कार्यक्रम दुपारी 5 वाजता संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे तर प्रमुख अतिथी रवींद्र खेबुडकर (मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग) तसेच  प्रमुख उपस्थिती माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी, सावंतवाडी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे आदि उपस्थित राहणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव  व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, अमोल सावंत (अध्यक्ष शालेय समिती, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी), सतिशचंद्र बागवे – अध्यक्ष शालेय समिती, चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,चौकुळ. तसेच संचालक मंडळ श्री. संदीप राणे, श्रीम. वसुधा मुळीक, श्रीम. छाया सावंत, श्रीम. स्नेहा परब यांची उपस्थिती लाभणार आहे.

या दोन दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शिक्षणप्रेमी, विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांनी अवश्य  लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम .प्रिती सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी कु. सोहम पालव, कु. सानिका ठाकूर, सांस्कृतिक प्रमुख कु. ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री कु. शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु  प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्त रजपूत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles