सावंतवाडीत उद्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा!

सावंतवाडी – ‘मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग’ व मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच फिट इंडिया अभियानाच्या सहकार्याने सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 28 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
“स्वस्थ राष्ट्र – समृद्ध राष्ट्र” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या स्पर्धेत मुलांसाठी कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक यांसारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुलींसाठी देखील कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या क्रीडा स्पर्धांना मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, टीम भावना आणि क्रीडासंस्कार विकसित करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
तालुकाभरातून खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धांबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सचिव पै. ललित हरमलकर (मोबाईल क्रमांक 96730 80812) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles