मुंबई : सरते वर्षे भाजपच्या अनेक निष्ठावंतांसाठी धक्कादायक ठरले. गेल्या दहा वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. मग त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. ज्या साहेबांसाठी पायाला भिंगरी लावून फिरलो. कार्यकर्ते जमा केले. पक्षाच्या सतरंज्यापासून ते मंडप टाकण्याची कामं केली. पक्षासाठी खस्ता खाल्या. अनेक कार्यक्रम राबवले. त्याला मंत्रिमहोदय उद्धघटनासाठी आले पण उमेदवारी कापली गेल्यानंतर हेच साहेब फोन सुद्धा घेत नसल्याने निष्ठावंतांनी टाहो फोडला. कुणाला भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क करण्यात येत आहे. पक्षातील निष्ठावंतांशी स्वतः मुख्यमंत्री बोलले आहेत.निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आल्याचेही समजते.
गोरेगाव भाजप बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात भाजपला यश –
मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची मनधरणी करण्यात आली.अमित साटम यांच्या मध्यास्थितीमुळे अखेर उमेदवार संदीप जाधव आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महामंत्री संदीप जाधव हे प्रभाग क्रमांक 54 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.भाजपाच्या सर्वे मध्ये त्यांच्या नाव येऊन सुद्धा प्रभाग क्रमांक 54 मधून त्यांना उमेदवारी न देता विप्लव अवसरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
यानंतर नाराज संदीप जाधव यांनी पक्षाला राम राम करून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संदीप जाधव यांची भेट घेतली.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी संदीप जाधव यांना भविष्यात मुंबई भाजपा कार्यकारणी मध्ये त्यांना स्थान देण्यात येईल त्यांच्या सन्मान राखला जाईल असा आश्वासन दिले. मुंबई शहरात भगवा झेंडा फडकवण्यासाठी देवा भाऊच्या नेतृत्वात काम करून देशासाठी आणि मुंबईसाठी काम केला पाहिजे असा आव्हान केले.त्यामुळे अमित साटम यांच्या मन धरणी मुळे संदीप जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज माघार घेत आहेत.यावेळी संदीप जाधव आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजप चे अधिकृत उमेदवार विप्लव अवसरे यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणतील असा विश्वास मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.



