२०-२५ हजारात मुली मिळतात अन्… ; भाजप महिला मंत्र्याच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य.

बरेली : “मुलींची काहीही कमी नाही… मुली तर 20 – 25 हजार रुपयांमध्ये मिळतात…!”, असं धक्कादायक वक्तव्य भाजप महिला मंत्र्याच्या पतीने केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा भाजप महिला मंत्रीचे पती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याआधी देखील त्यांनी धक्कादायक कृत्य केलं आहे. आता मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पण यापूर्वी त्यांनी नोकराची किडनी काढली आणि स्वतःच्या पहिल्या पत्नीला ट्रांसप्लांट केली. ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते.

महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचं एक विधान आता भाजपासाठी एक नवीन राजकीय डोकेदुखी बनलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोध करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. सांगण्यात येत आहे की, सोमेश्वर विधानसभेच्या शीतलखेत मंडळातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत, अनेकदा वादात सापडलेले उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी गिरधर लाल साहू यांनी असं विधान केलं ज्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles