महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले. ; ‘लावा झाड एक तरी!’ संकल्पनेतून अंगणवाडी क्र. १५ चा अभिनव हळदीकुंकू, वाण स्वरूपात तुळशीच्या रोपांचे केले वाटप.

सावंतवाडी :  आपल्या सावंतवाडी शहरातील महिलांना सुखी आणि समृद्ध करण्याची आमची प्रतिज्ञा आहे. महिलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा कष्ट जाणवले, तर त्यांनी बेधडक नगरपरिषदेत यावे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केले.

शहरातील उभाबाजार येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मधील अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने आयोजित अभिनव हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

‘तुळस आणि जीवन’ यांचे अतूट नाते –
यावर्षीचाही हळदीकुंकू सोहळा ‘एक तरी झाड लावा’ या सामाजिक संकल्पनेतून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या की, “तुळस आणि मानवी जीवन यांचे जवळचे नाते आहे. तुळशीमुळे आपल्याला अमूल्य असा प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. भविष्यात प्राणवायूसाठी मानवाला संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगणात किंवा टेरेसवर तुळशीचे रोप लावले पाहिजे.”

अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने गेल्या १० वर्षांपासून हळदीकुंकवाचे वाण म्हणून ‘प्लास्टिक’ किंवा ‘वस्तू’ ऐवजी तुळशीचे रोप दिले जाते. या उपक्रमाचे कौतुक करताना नगराध्यक्षांनी सांगितले की, घरची स्त्री आणि तुळशी वृंदावन यांचे नाते समृद्धीचे प्रतीक आहे. या रोपांमुळे घरात आरोग्य आणि मांगल्य नांदते.

कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांच्या हस्ते नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका दुलारी रांगणेकर आणि मोहिनी मडगावकर यांचाही सन्मान करण्यात आला. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी श्रेया आडीवरेकर यांनी स्वीकारला.

यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, अमिषा सासोलकर (मदतनीस), सरिता भिसे, पालक व शिक्षक,  मीना दाभोलकर, नेहा काष्टे, ज्योती कदम, स्वानंदी नेवगी, जानवी गावडे व इतर चिमुकली मुले शुभांगी मेस्त्री, गीतांश मुंज, सहावी नेवगी, अथांग मातोंडकर आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा काष्टे यांनी केले, तर ज्योती कदम यांनी तुळशी वृंदावनाचे महत्त्व विशद केले. अंगणवाडीतील बालकांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी नगराध्यक्षांसोबत ‘सेल्फी’ घेत आनंद व्यक्त केला.


(सावंतवाडी शहरात अंगणवाडी क्रमांक 15 च्या अभिनव हळदीकुंकू समारंभात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना तुळशी रोप वाण देताना अंगणवाडी सेविका अनुराधा पवार. सोबत दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर, श्रेया आडिवरेकर, मीना दाभोलकर, अमिषा सासोलकर आदी.)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles