सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना – भाजप युतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना – भाजप युतीचा जागावाटप फॉर्म्युला खासदार नारायण राणे यांनी आज जाहीर केला. यात एकूण ५० जागांपैकी भाजप ३१ आणि शिवसेना १९ जागा लढणार आहे. तर पंचायत समितीच्या १०० जागांपैकी भाजप ६३ आणि शिवसेना ३७ जागा लढणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटालाही काही जागा दिल्या जाणार आहेत. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. उद्या सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी आज दिली.

येथील ओम गणेश निवासस्थानी श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोणताही वाद न होता युतीचे जागा वाटप झाले आहे.

जागावाटप सूत्रानुसार- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जि.प.भाजप ११, सेना १७, प.स. भाजप ६, सेना १७ जागा.

कुडाळ विधानसभा मतदारसंघात जि.प. भाजप ४, सेना १५, प.स. भाजप ११ सेना १५ जागा.

कणकवली विधानसभा मतदारसंघात जि.प.भाजप १६, सेना २, प.स. भाजप ३१, सेना ५ जागा असे जागावाटप निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचाही फॉर्मुला निश्चित झाला आहे यात तीन वर्ष भाजप आणि दोन वर्ष शिवसेना असे अध्यक्ष पदाचे सूत्र राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles