सावंतवाडी : अखेर माजगाव पंचायत समिती मतदार संघामध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. शिंदे शिवसेनेचे आबा सावंत यांनी अपक्ष पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल आहे. महायुतीच्या बैठकीत आपल्याला सहभाग करून न घेतल्याने आपण ही बंडखोरी करत असल्याच त्यांचं म्हणणं आहे. लोकांच प्रेम आणि आशीर्वाद असल्यामुळे माझा हा विजय निश्चित आहे, असे देखील सावंत यांनी सांगितले. बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित असून आगामी तीन-चार दिवसात ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्हा वसे यांचे लक्ष लागले आहे.



