माजगाव जिल्हा परिषदेसाठी दिनेश सावंत यांना बहुमताने विजयी करण्याचा खोतवाडा ग्रामस्थांचा निर्धार!

सावंतवाडी: माजगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश बाबली सावंत यांना बहुमताने विजयी करण्याचा ठाम निर्धार माजगाव खोतवाडा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

आज झालेल्या बैठकीत खोतवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी, “आम्ही कायम दिनेश सावंत यांच्या पाठीशी राहणार” असा एकमुखी विश्वास व्यक्त केला. बैठकीत निवडणूक रणनीती, प्रचाराची दिशा आणि एकत्रित प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली.

खोतवाडा ग्रामस्थांच्या या निर्धारामुळे माजगाव जिल्हा परिषद निवडणुकीत दिनेश सावंत यांची बाजू अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles