✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात एक गोष्ट सातत्याने दिसून येते “जो नेता जिथे गरज आहे, तिथे उभा राहतो, तोच खरा लोकप्रतिनिधी ठरतो.!”
सावंतवाडी मतदारसंघातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्य पाहिले, तर संदीप एकनाथ गावडे हे नाव या निकषांवर सातत्याने पुढे येताना दिसते.

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत गेल्या अनेक वर्षांत संदीप गावडे यांनी कोणताही भेद न ठेवता समाजाच्या विविध घटकांसाठी काम केले आहे.
गेळे येथील जमिनी वाटपाचा प्रश्न सोडविला. शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जो प्रश्न अनेक वर्षे केवळ फाइल्समध्ये अडकून होता. तो तत्कालीन पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व संदीप गावडे यांच्या मध्यस्थीने मार्गी लागला.
रखडलेले प्रश्न केवळ मांडून नव्हे, तर प्रत्यक्ष सोडवून दाखवणे, हीच त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे.
मडेवाडी येथील तब्बल ४०–४२ वर्षे प्रलंबित असलेला रस्ता त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात साकारला गेला. हा केवळ रस्त्याचा प्रश्न नव्हता, तर पिढ्यान्पिढ्या दुर्लक्षित राहिलेल्या गावाच्या आत्मसन्मानाचा विषय होता. अशा उदाहरणांमुळे ‘जिथे हवा विकास, तिथे संदीप गावडे हमखास!’, हे वाक्य केवळ घोषवाक्य न राहता अनुभवजन्य वास्तव ठरते.

कोकणच्या लोकसंस्कृतीलाही दिली चालना!
कोकणाची लोकसंस्कृती जपण्याच्या दृष्टीनेही भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी नेहमीच मोलाचे काम केले आहे. आज पर्यंत त्यांनी शेकडो भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करून भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे दैवी कार्य केले आहे. तसेच सावंतवाडी शहरात दिमाखात साजरा झालेला दहीहंडी उत्सव आणि या दहीहंडी उत्सवातून आपली आध्यात्मिकता जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री गावडे यांनी केले आहे. या उपक्रमांतून त्यांनी परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणला आहे. विकास म्हणजे फक्त सिमेंट-कॉंक्रिट नव्हे, तर सांस्कृतिक ओळख जपणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, ही भूमिका त्यांच्या कामातून स्पष्ट दिसते.
– प्राथमिक शाळांना सोलर पॅनेल व शैक्षणिक साहित्य वाटप –
सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तालुक्यांमध्ये संदीप गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेता त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. हे वाटप करत असताना त्यांनी केवळ एकच वर्ष वाटप केले नाही तर गेली अनेक वर्ष त्यांनी आपल्या या स्तुत्य उपक्रमात सातत्य राखले आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. श्री. गावडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ग्रामीण भागातील वीज समस्या लक्षात घेऊन शाळांना सोलर पॅनेल देखील उपलब्ध करून दिले. ही त्यांच्या कल्पकतेची पावती देणारी बाब आहे.
– ‘बाहेरचा’ स्टॅम्प नको विकासाचे मेरिट बघावं!-
आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून ते उमेदवार म्हणून समोर येत असताना, काही ठिकाणी “बाहेरचे” अशी टीका ऐकू येते. मात्र लोकशाहीत प्रश्न असा उभा राहतो की, नेत्याची ओळख जन्मस्थानावरून करायची की कामावरून? सावंतवाडी मतदारसंघात त्यांनी कधीही परकेपणाची भावना ठेवली नाही. उलट गरज जिथे असेल तिथे स्वतःला जोडून घेतले. संदीप गावडे यांनी आतापर्यंत केलेले कार्य पाहता त्यांचे कार्य मर्यादित नाही. संत ज्ञानदेवांनी पसायदानमध्ये सांगितलेली *’हे विश्वची माझे घर!* हे सूत्र त्यांनी आपल्या विकासात्मक कामातून दाखवून दिले. त्यांच्याकडे जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती कोणत्याही भागातील समस्या घेऊन गेला तरी त्या समस्येला सोडविण्यासाठी ते निरंतर प्रयत्न करतात केवळ प्रयत्न करत नाही तर ती समस्या सोडवून दाखवितात हे त्यांच्या कार्यप्रणालीचे खरे गमक आहे. म्हणून केवळ बाहेरचा ही उपहासात्मक आणि संकुचित वृत्ती न बाळगता विकासाच्या मेरिटवर संदीप गावडे विरोधकांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषीची गरज वाटत नाही.
आज राज्य, केंद्र आणि जिल्हा या तीन्ही स्तरांवर सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीशी असलेली त्यांची जवळीक, विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले स्नेहसंबंध, हे केवळ राजकीय समीकरण नसून विकासासाठीची एक संधी म्हणून पाहिली जाते. सत्तेचा उपयोग कसा करायचा, वरिष्ठ नेतृत्वाकडून निधी आणि योजना कशा खेचून आणायच्या, याची हातोटी त्यांच्याकडे आहे, हे त्यांच्या आतापर्यंतच्या कामातून दिसून आले आहे.
कोकणची लोकसंस्कृती जपणाऱ्या भजनी मंडळांसाठी शेकडो ठिकाणी भजन साहित्य वाटपाचा उपक्रम असो वा सावंतवाडी शहरात दिमाखात साजरा झालेला दहीहंडी उत्सव हे सगळं कोणासाठी? तर फक्त आपल्या जनतेसाठीच!,
लोकसंस्कृती जपताना त्यांनी कधी मतदारसंघाची सीमा विचारली नाही.
आज मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत उतरल्यावर अचानक “बाहेरचा” हा मुद्दा पुढे आणला जातो. खरं तर हा मुद्दा विकासाचा नसून भीतीचा आहे. कारण ‘काम करणारा माणूस आला तर आपल्या अपयशावर प्रकाश पडेल याची विरोधकांना जास्त भीती आहे.’
संदीप गावडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. केंद्र, राज्य आणि जिल्हा तीन्ही स्तरांवर सत्ता असताना त्या सत्तेचा फायदा तळवड्यासाठी कसा करून घ्यायचा, हे ज्याला कळतं, तोच खरा लोकप्रतिनिधी ठरतो. केवळ नावापुरता प्रतिनिधी नव्हे, तर निधी, योजना आणि निर्णय प्रत्यक्षात आणणारा नेता आज तळवडे मतदार संघाला हवा आहे.
आजचा तरुण वर्ग स्पष्ट बोलतोय – “विकास हवा असेल तर संदीपच हवा!” कारण आजच्या पिढीला भाषणं नकोत, निकाल हवेत.
भारतीय संविधानाची प्रस्तावना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची आठवण करून देते. आपल्याला शालेय जीवनात भारताची प्रतिज्ञा पहिल्याच पानावर का दिली गेली आहे?, त्या प्रतिज्ञामध्ये सर्वात पहिलं वाक्य आहे, *”भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत!”* मग आमच्या डोक्यामध्ये ‘बाहेरचा’ ही संकुचित वृत्ती यायलाच नको. आम्हाला विकासाच्या मेरिट वरच विचार करावा लागेल कारण प्रत्यक्षात केवळ जन्मस्थानावरून उमेदवाराला नाकारायचं असेल, तर ही मूल्यं आपण कितपत पाळतोय?, हा प्रश्न सुज्ञ मतदारांनी स्वतःला विचारायला हवा.
हा लढा व्यक्तीचा नाही, हा लढा संकुचित विचार विरुद्ध विकासदृष्टीचा आहे.!
आणि इतिहास साक्षी आहे – जिथे विकासाचा विचार जिंकतो, तिथे तळवडेसारख्या मतदारसंघांचा कायापालट होतो.
संदीप गावडे यांच्यासारखं नेतृत्व संधी मागत नाही, ते संधी निर्माण करतं. आता निर्णय तळवडेच्या जनतेकडे आहे,
“बाहेरचा” ठरवायचं की “भविष्य घडवणारा” निवडायचा?
जिल्हा परिषद सदस्य केवळ मिरवायचे पद नाही तर खरे “लीडरशिप ट्रेनिंग ग्राऊंड!’
महाराष्ट्राच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य हे पद केवळ मिळवायचे नाही तर ते खरे लीडरशिप ट्रेनिंग ग्राउंड आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतून पुढे मोठ्या पदांपर्यंत अनेक नेते घडले आहेत. उदाहरणार्थ –
१) स्व. गोपीनाथ मुंडे-
सुरुवात: बीड जिल्हा परिषद सदस्य
पुढे: उपमुख्यमंत्री, मंत्री, भाजपचे राज्यस्तरीय नेते
ओळख: ग्रामीण भागातून उभे राहिलेले करिष्माई नेतृत्व.
२) स्व. अजितदादा पवार
सुरुवात: पुणे जिल्हा परिषद सदस्य
पुढे: उपमुख्यमंत्री (अनेक वेळा), अर्थमंत्री
ओळख: सहकार व प्रशासनातील मजबूत पकड.
३) एकनाथ खडसे-
सुरुवात: जळगाव जिल्हा परिषद सदस्य
पुढे: मंत्री (महसूल, जलसंपदा), विरोधी पक्षनेते
ओळख: खानदेशातील प्रभावी नेता.
४) जयंत पाटील (इस्लामपूर) –
सुरुवात: सांगली जिल्हा परिषद सदस्य
पुढे: मंत्री (अर्थ, जलसंपदा), प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी)
ओळख: धोरणात्मक व अभ्यासू नेता.
५) हसन मुश्रीफ –
सुरुवात: कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य
पुढे: मंत्री (कामगार, आरोग्य, ग्रामविकास इ.)
ओळख: सहकार व सामाजिक क्षेत्रातील काम.
६) गुलाबराव पाटील –
सुरुवात: जळगाव जिल्हा परिषद सदस्य
पुढे: मंत्री (जलसंपदा, ग्रामीण विकास)
ओळख: ग्रामीण मतदारांमध्ये मजबूत पकड.
७) पांडुरंग फुंडकर –
सुरुवात: जिल्हा परिषद पातळीवर काम
पुढे: मंत्री (कृषी)
ओळख: शेतकरी प्रश्नांवरील ठाम भूमिका.
म्हणून तळवडे मतदार संघातील सुज्ञ मतदार बांधवांनी एकच विचार करावा तो म्हणजे – जिल्हा परिषद हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे “लीडरशिप ट्रेनिंग ग्राउंड” मानले जाते. म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर विकासाचं विजन आणि निधी खेचून आणण्याची क्षमता असलेला आपला जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून दिला पाहिजे. या सर्व गोष्टींवर संदीप गावडे हे परफेक्ट ठरतात. म्हणून त्यांच्या बाजूने आपण खंबीर साथ देणे गरजेचे वाटते.
भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जर खऱ्या अर्थाने अंगीकारायची असतील, तर व्यक्तीऐवजी विचार, आणि जन्मस्थानी ऐवजी विकासदृष्टी महत्त्वाची ठरते. त्यामुळे तळवड्याच्या चर्चेत आज एक प्रश्न केंद्रस्थानी आहे – ‘संकुचित दृष्टिकोन की व्यापक विकासदृष्टी?’
उत्तर मात्र जनता आणि काळ देईल. पण एक गोष्ट नक्की—कामाच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणारे संदीप गावडे यांच्यासारखे विकासाचे व्हिजन घेणारे आणि त्यासाठी अहोरात्र झिजणारे नेतृत्व दुर्लक्षित राहात नाही.!
चला तर मग आपल्या मतदारसंघासाठी फक्त मी फक्त विकासाला साथ देऊया, ‘संदीप गावडे’ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहूया!



