‘बीकेसी’चे शिल्पकार अच्युत सावंत-भोसले यांचे पितृछत्र हरपले! ; प्रगतीशील बागायतदार यशवंत सावंत-भोसले यांचे निधन.

सावंतवाडी : येथील भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचे वडील आणि यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, एक प्रगतीशील बागायतदार यशवंत सावंत-भोसले (वय ९२) यांचे काल रात्री गोवा येथील मणीपाल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ म्हणून परिचित असलेल्या सावंत-भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. स्व. यशवंत सावंत-भोसले यांनी आपल्या आयुष्यात शेती आणि शिक्षण अशा दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले होते. बागायतदार म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, तसेच यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यातही ते सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे भोसले नॉलेज सिटी, शैक्षणिक संस्था आणि सावंत-भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी १०.३० वाजता शिरवल (ता. दोडामार्ग) येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार असून तिथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने दोडामार्ग तालुक्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles