सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव पंचायत समिती निवडणूक आता चांगलीच तापली आहे. खुल्या प्रवर्गाची जागा असताना ऐनवेळी एका ज्येष्ठ भाजप पदाधिकाऱ्याच्या हट्टापायी इतर मागासवर्गीय उमेदवार लादल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष उसळला—आणि याच असंतोषातून राजकीय भूकंप घडला!
या अन्यायाविरोधात अपक्ष उमेदवार आबा सावंत यांनी थेट मैदान सोडत मराठा समाजावर झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध केला आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गांवकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
ही सगळी घडामोड घडवून आणण्यात वेत्त्येचे उपसरपंच गुणाजी गावडे यांची किंगमेकर भूमिका निर्णायक ठरली.
“आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकच उमेदवार उभा करूया आणि अन्यायाची परतफेड विजयाने करूया,” या भूमिकेतून ‘फक्त मराठा’ या एकसूत्री लढ्याखाली जितेंद्र गांवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
पत्रकार परिषदेत आबा सावंत ठामपणे म्हणाले—
“आपण समाजावरील अन्याय सहन करणार नाही. माझे धडाडीचे मित्र जितेंद्र गांवकर यांना मी बिनशर्त पाठिंबा देत आहे!”
परिणाम काय होणार?
माजगाव पंचायत समितीची निवडणूक आता नव्या वळणावर आली असून मराठा ट्रम्प कार्ड निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान आपल्याला आबा सावंत यांनी पाठिंबा दिल्यामुळे आमची ताकद वाढली असून नक्कीच त्यांचा मानसन्मान राखून त्यांच्या विश्वासाला कधीही तळा दिला जाणार नाही असे अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर यांनी सांगितले व आबा सावंत यांचे मनापासून आभार मानत असल्याचे स्पष्ट.
यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर, आबा सावंत, गुरुदास गांवकर, गोविंद गावडे, तन्मय पाटकर आदी मान्यवर.



