गद्दारांना क्षमा नाही व्हावे लागेल पाय उतार! : संजू परब गरजले. ; दोडामार्ग येथील विजयी उमेदवारांचा स्नेह सत्कार संपन्न.

दोडामार्ग : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे १०० % उमेदवार विजयी झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मणेरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सौ.साक्षी विशांत तळवडेकर, झरेबांबर पंचायत समिती सदस्य म्हणून श्रीमती स्नेहा संजय गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य म्हणून सौ.सायली स्वप्निल निंबाळकर तर कोलझर पंचायत समिती सदस्य म्हणून बिनविरोध गणेशप्रसाद गवस निवडणूक आल्याने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करा आमचे सदैव आपणांस सहकार्य लाभेल असे सांगितले.

गद्दारांना क्षमा नाही व्हावे लागेल पाय उतार! – संजू परब.
दरम्यान यावेळी राजू निंबाळकर व विलास सावंत यांनी निवडणूक काळात काहींनी चुकीचा प्रचार केला स्वकीयांनी अपक्षांना साथ दिली असे कथन केल्याने जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांना क्षमा नाही त्यामुळे पक्ष वाढत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना पायउतार व्हावे लागेल असा इशारा दिला.

यावेळी प्रेमानंद देसाई, विशांत तळवडेकर, गोपाळ गवस, सुनिल गवस, तळेखोल सरपंच सौ.सावंत, कोलझर सरपंच सौ.गवस, झोळंबे सरपंच कु.विशाखा नाईक, कुडासे माजी सरपंच सौ.पुजा देसाई, सासोली सरपंच बळीराम शेटये, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, कुडासे-खुर्द उपसरपंच राजन गवस, स्वप्निल निंबाळकर, दादा देसाई, रामदास मेस्ञी, अमरसिंग राणे, भगवान गवस, राजेश नाईक, गुरुदास सावंत, राकेश धर्णे, सुर्यकांत गवस, विलास सावंत, उमेश सातार्डेकर, बबलू पांगम आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles